समुद्रपूर: चापापूर येथे गळफास घेऊन ३० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, गिरड पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
समुद्रपुर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चापापुर येथे ३० वर्षीय इसमाने गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आज शुक्रवारी वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश गजभे वय ३० वर्ष असे मृत्यकाचे नाव आहे.मृत्यक गणेश गजभे यांच्या पत्नीने सोडचिठ्ठी घेतल्याने तो नेहमीच विवंचनेत राहत होता याचं गोष्टीचा मनस्ताप घेऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.