समुद्रपूर: गिरड येथे मिशन १० हजार वृक्ष लागवड अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वार्ड क्रमांक १,२ व ४ येथे ९५ वृक्षांची लागवड
मिशन १० वृक्ष लागवड अभियानांतर्गत गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या वतीने अंतर्गत २३ जून रोज रविवारला सकाळी ७ ते १० या वेळेत वार्ड क्रमांक १वार्ड क्रमांक २ वार्ड क्रमांक ४ इथे जाऊन नागरिकांच्या घरी ९५ फळझाडांची लागवड करण्यात आली. सर्व निसर्गप्रेमी बालगोपाल यांच्या सहकार्याने घर तिथे फळझाड लागवड करण्यात आली यामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक विष्णू ब्राह्मणवाडे, मंथन भांदक्कर ,नितीन लाजूरकर ,साहिल सोनवणे ,अथर्व शिवणकर आदी सहभागी झाले होते.