रामटेक: वाघ फिरतोय शिवारात.... आम्ही शेती कशी करावी? आदिवासी शेतकरी,पशुपालक, ग्रामवासीयांचा वनविभागाला सवाल #Jansamasya
Ramtek, Nagpur | Jul 5, 2025 मागील काही महिन्यांपासून लोधा, करवाई, सालई,पिपरिया, बोंदरी, बोर्डा, सत्रापूर सह काही गाव परिसरात,शेती शिवारात वाघांनी धुमाकूळ घातला असून काही पशुंसह दोन गुरख्यांचा बळी घेतला आहे. यापूर्वीही शेतकरी, गुराखी वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडले आहेत. या वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करतानाच आम्ही शेती कशी करावी? असा सवाल आदिवासी शेतकरी, ग्रामवस्यांनी वनविभागाला केला आहे.