सेलू: वर्धा-नागपूर रोडवर राजपाल पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालक ठार, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Oct 23, 2024 ट्रकचा टायर बदलवित असतांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार झाला. ही घटना ता. 22 मंगळवारी मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान वर्धा-नागपूर रोडवर राजपाल पेट्रोल पंप नजीक नर्सरी जवळ घडली. निळकंठ मसराम असे मृतकाचे नाव आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.