सेलू: सुरगाव येथे क्षुल्लक कारणातून एकास शिवीगाळ करून दिली मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत एकाविरुद्ध तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 24, 2024 क्षुल्लक कारणातून एकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील सुरगाव येथे ता. 21 सोमवारी दुपारी 3.30 वाजता घडली. याप्रकरणी नितेश देविदास नेहारे रा. सहेली ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी विजय चौधरी रा. सुरगाव यांचे विरुद्ध ता. 22 मंगळवारी रात्री 8.45 वाजता तक्रार दाखल केली. अशी माहिती ता. 23 ला सेलू पोलिसांनी दिली.