भडगाव: कजगाव येथील मराठा समाज मंगल कार्यालय परिसरात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी, पत्रकारांचाही सत्कार,
कजगाव येथे मध्य चौकातील मराठा समाज मंगल कार्यालय परिसरात आज दिनांक 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊंचे जयंतीचे औचित्य साधून परिसरातील व गावातील पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ट्रेन लाईव्ह न्युज चे गोंडगाव येथील पत्रकार रतीलाल पाटील यांचाही मुख्य सत्कार करण्यात आला यांच्याबरोबर गावातील लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी व नितीन सोनार यांचा सत्कार करण्यात आला,