काँग्रेसविरोधात भाजप महिला मोर्चाचे छत्रपती संभाजीनगरात निषेध आंदोलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 24, 2026
आज दिनांक 24 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आयोजित एआय समिटदरम्यान काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करून देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला असून आंदोलनात महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभाग