दि. 2 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास धर्माबाद तालुक्यातील मौजे आटाळा शिवारातील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदी पात्रात आरोपी संतोष पांडुरंग भोसले व इतर 10 ते 12 जणांनी गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना बेकायदेशीररित्या 55 ते 60 ब्रास काळी रेती जिची किंमत 1,80,000 रु. मुद्देमाल उत्खनन करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करत केली यावर महसूल व पोलिसांनी कारवाही करत हे मु्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केले आहेत.