नागपूर शहर: गणेश नगर येथे एचडीएफसी बँकेचे मॅनेजर असल्याचे सांगून 50 लाखाची फसवणूक, कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल
गणेश नगर येथे राहणाऱ्या प्रियंका तांबेकर या घरी हजर असताना आरोपी सौरभ मिश्रा यांनी घरी येऊन त्याने एचडीएफसी बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगितले. व प्रियंका यांचे अकाउंट मेंटेन करण्याच्या पाहण्याने मोबाईल घेऊन नेट बँकिंग द्वारे त्यांच्या खात्यातील 50 लाख रुपये दुसऱ्याच्या खात्यात वळते केले. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.