भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे जागरूक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना जागरूक सप्ताह बाबत माहिती मिळावी म्हणून नाशिक लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलीस हवालदार प्रफुल माळी, पोलीस हवालदार विलास निकम यांनी नाशिकरोड बस स्टँड येथील रिक्षा चालकांना माहिती देत रिक्षांवर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र अंतर्गत जागरूक सप्ताहाचे स्टिकर्स लावून जनजागृती केली.