बुलढाणा तालुक्यातील पाडळी रोडवर १ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश अशोक शेजोळ वय २७ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी धनंजय भास्कर शेजोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.