परतूर: 24 जून रोजी परतुर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा चे आयोजन ,आर.पी.आय.चे महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे यांनी दिली माहिती
Partur, Jalna | Jun 23, 2026 आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 8वाजता आरपीआयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माहिती दिली आहे व सकल हिंदू समाज बांधवांना आवाहन सुद्धा केली आहे की काही दिवसापूर्वी परतुर शहरातील किड्स इंग्लिश स्कूल या शाळेत जीहादि गाणे एका कार्यक्रमात वाजवण्यात आले, पाकिस्तानी दहशतवाद्याचा फोटो सुद्धा दाखवण्यात आला, मुलांच्या हातात तलवारी देण्यात आल्या त्यामुळे त्याच्या विरोधात सकल हिंदू संघटनेचा हा मोर्चा आहे.