मावळ: देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची अलोट गर्दी
Mawal, Pune | Jul 6, 2025 आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहूत विठ्ठल-रुक्मिणी आणि तुकोबारायांच्या दर्शनासाठी भाविकांनी पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच मुसळधार पावसातही छत्र्या अंगावर घेत भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.