अंबरनाथ: बदलापूर येथील रहिवासी असलेले दीपक पाठक यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू
काल अहमदाबाद मध्ये मोठी विमान दुर्घटना झाली. या विमान दुर्घटनेमध्ये 200 पेक्षा जास्त प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत. मात्र याच दुर्घटनेमध्ये बदलापूर मधील रहिवासी असलेले दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे. दीपक पाठक एअर इंडिया सोबत केबिन क्रू म्हणून काम करत होते. दीपक पाठक यांच्या मृत्यूची बातमी समजताच आज दिनांक 13 जून रोजी रात्री बाराच्या सुमारास आमदार किसन कथोरे यांनी दीपक पाठक यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.