समुद्रपूर: तालुक्याचा दहावीचा निकाल ९४.१७ टक्के, ९२.६० टक्के गुणांसह गिरडचा पियुष मोटघरे व वासीची धनु गुळघाणे तालुक्यात प्रथम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी २७ मे रोजी घोषित करण्यात आला असून या विकास विद्यालय ,गिरडचा पियुष मोटघरे व ज्ञानज्योती इंग्लीश स्कूल वासीची धनु गुळघाणे ९२.६० टक्के गुण घेत तालुक्यात संयुक्तपणे प्रथम आले. तालुक्याचा निकाल ९४.१७ टक्के लागला असून नऊ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.