समुद्रपूर: वासी येथे जुन्या वादातून ३ मित्रांवर चौघांनी धारदार शस्त्राने हल्ला करून केले जखमी, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
समुद्रपुर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासी येथे जुन्या वादातून तिन मित्रांवर चार जणांनी धारधार शस्त्राने जिवघेणा हल्ला करून जखमी केले असून यासंबंधी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे तर जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमी स्वप्नील राऊत, वैभव राऊत,वृषभ राऊत यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी हलविले असुन त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.पुढिल तपास ठाणेदार संदिप गाडे करीत आहेत.