बार्शी: मुंगशी आर येथे २ ठिकाणी चोरी; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
बार्शी तालुक्यातील मुंगशी आर येथे दोन ठिकाणी चोरी झाली आहे. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. मुंगशी आर येथील हरिदास गणपत डोकळे आणि प्रमोद भागवत साठे यांच्या घरी चोरी झाली. याबाबत दोघांनी आज 6 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती दिली आहे. अद्याप याबाबत गुन्हा दाखल झाला नाही. हरिदास ढोकळे हे आजारी असल्याने वैराग येथे आले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. तसेच प्रमोद साठे झोपलेल्या खोलीस कडी लावून दुसऱ्या खोलीतील मुद्देमाल लंपास केला आहे.