देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी जागतिक नेतृत्वावर विश्वास ठेवत देशसेवा, परिवर्तन आणि सर्वांगीण विकासाच्या प्रवाहात सहभागी होत आज मुल तालुक्यातील श्री. जीवन कोंतमवार, श्री. किशोर कापगते आणि सौ. उषाताई शेंडे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. विजयजी लोनबले यांच्यासह तब्बल 23 काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षाचा दुपट्टा टाकत त्यांचे भाजपा परिवारात सहर्ष स्वागत केले.