दिनांक १३/१०/२०२६ रोजी नेकणूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीचर्स कॉलनीसमोर एका वॉशिंग सेंटरवर ट्रॅक्टर धुवत असताना, वडगाव कळसंबर येथील शेतकरी श्री. रामचंद्र खमकर यांचे बँकेतून काढून आणलेले १,००,०००/- रुपये (एक लाख रुपये) हरवल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर नेकणूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी व परिसराची पाहणी करून सखोल चौकशी व तपास सुरू केला. पोलिसांच्या या तत्पर आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे हरवलेली संपूर्ण १,००,०००/- रुपयांची रक्कम शोधून काढण्यात यश आले. आज सदर रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकरी श्री. रामचंद्र खमकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
कष्टाचा व हक्काचा पैसा सुरक्षितपणे परत मिळाल्यामुळे शेतकरी बांधवाने व ग्रामस्थांनी नेकणूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आपल्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी बीड पोलीस सदैव तत्पर आहेत. �
67 views | Beed, Maharashtra | Oct 15, 2026