उदगीर: आम्हाला भाजी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, हातगाड्यावाल्यांची मागणी
Udgir, Latur | Dec 13, 2025 उदगीर शहरातील भाजी मार्केट येथील भाजी विक्रेते प्रशासनाला कंटाळले असून प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप हातगाड्या वाल्यांनी केलाय,भाजी मंडई येथे बांधण्यात आलेल्या इमारतीत नगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास हातगाडे वाले रस्त्यावर येऊन कशाला भाजी विक्री करेल असा प्रश्न ही उपस्थित केला, आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे दररोज भाडे देत असलो तरी प्रशासना कडून नेहमी आम्हाला त्रास होतोय, प्रशासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे