गॅस सिलिंडरमध्ये चक्क पाणी? धाराशिवच्या नीरज एचपी गॅस एजन्सीवर प्रश्नचिन्ह!
धाराशिव येथील नीरज एचपी गॅस एजन्सीकडून घेतलेला घरगुती गॅस सिलिंडर अवघ्या पंधरा दिवसांत संपल्याने ग्राहकाला संशय आला. त्यानंतर तपासणी केली असता सिलिंडरमध्ये पाणी आढळल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला आहे. या प्रकारामुळे गॅस एजन्सीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुरवठा विभागाने सिलिंडरची अधिकृत तपासणी करून सखोल चौकशी करावी आणि अनियमितता आढळल्यास दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
#dharashiv #LatestNews #Golmal #questionmark #LatestNews
Dharashiv, Dharavshiv | Oct 17, 2026