मोर्शी: मोर्शी ते पाळा रोडवर मिनी ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात, २० प्रवाशांना गंभीर दुखापत
शिराळा पुसदा येथून सालबर्डी कडे अस्थि विसर्जना करिता जात असलेल्या मिनी ट्रकला, दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाळा ते मोर्शी रोडवर कुत्रा आडवा गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात वीस प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातातील सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे उपचार केल्यानंतर, अपघातातील गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले