जिंतूर: केहाळात हळदीच्या शेतातून 7 लाखांचा बेकायदा गांजा जप्त
जिंतूर तालुक्यातील केहाळ शिवारात हळदीच्या शेतात 7 गांजाच्या झाडांची लागवड आढळून आली. पोलिसांनी 14.150 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी गोकुळ घुगे याला एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.