इगतपुरी: इगतपुरी नगर परिषदेचे निवडणूक प्रक्रिया पूर्ण रात्री आठ वाजेपर्यंत ६८.६८ टक्के मतदान
इगतपुरी नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आज खेळीमेळीच्या वातावरणात पास पडली या निवडणुकीत 21 नगरसेवक पदासाठी 70 उमेदवार तर एक नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार आपले नशीब आजमावत असून या सर्वांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले आहे रात्री आठ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू होती यात 68.68% मतदान झाले आहे दरम्यान निकाल 21 तारखेला येणार असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे