परतूर: शहरातील नागवंश नगर येथे गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या
Partur, Jalna | Jun 11, 2026 आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर शहरातील नागवंशी नगर येथे खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनी त्याच्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 9जून रोजी घडली आहे ,शेख शब्बीर दादामिया वय 40 वर्षे राहणार सेलू जिल्हा परभणी हल्ली मुक्काम नागवंश नगर परतुर असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेली नाही, सदर घटनेची नोंद परतुर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.