जालना: जालन्यात महिलांचा सन्मान धोक्यात: शौचालये आहेत, पण वापरण्यायोग्य नाहीत!
– ॲड. अश्विनी धन्नावत यांचा प्रशासनावर तीव्र हल्
Jalna, Jalna | Mar 30, 2026 जालन्यात महिलांचा सन्मान धोक्यात: शौचालये आहेत, पण वापरण्यायोग्य नाहीत! – ॲड. अश्विनी धन्नावत यांचा प्रशासनावर तीव्र हल्लाबोल.. आज दिनांक 30 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात महिलांसाठी मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक शौचालयांच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे महिलांचा सन्मानच धोक्यात आला आहे. “शौचालये बांधली, पण दारे, नळ आणि पाण्याची सोयच नाही,” असा संतप्त आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या ॲड. अश्विनी धन्नावत यांनी प्रशासनाच्या