जिंतूर: बोरी गावात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सहा जणांचा चावा ; गंभीर जखमींवर बोरी व जिल्हा रुग्णालयात उपचार
बोरी गावातील महादेव मंदिर, करवली रोड, बस स्थानक परिसरासह विविध भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत सहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार 2 डिसेंबर रोजी घडली. जखमींना बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी बी के पवार यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.