नागपूर शहर: एका रात्रीत बनला सुपरस्टार ! 24 तासात प्रफुल हिंगेचे 1 हजारा वरून 4 लाखावर फॉलोवर्स
प्रफुल हिंगेने आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी केली जी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी मीचेल्स स्टार्क आणि डेल स्टेन यासारख्या अनेक दिग्गजांनाही साधता आली नाही इंडियन प्रीमियर लीगच्या 19 वर्षाच्या इतिहासात आपल्या पहिल्याच षटकातील बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याने 13 एप्रिल ला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चार बळी घेतले ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. या कामगिरीमुळे नागपूरचा मराठमोळा प्रफुल हिंगे हा रातोरात स्टार बनला.