समुद्रपूर: कोरा टी पॉईंटवरील शेतात अवैधपणे साठवणूक करून कत्तलीसाठी ४७ जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, चौघांना अटक
गिरड कोरा मार्गावरील कोरा टि पॉईंटवरील एका शेतात अवैध जनावरांची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून कत्तकरण्यासाठी अवैध जनावरांची वाहतूक करुन कत्तलखान्यात नेत असलेल्या ४४ जनावरांना पोलिसांनी जीवनदान दिले तर यावेळी घटनास्थळी १ बैल २ बछडे मृत्य अवस्थेत आढळून आले.यावेळी ४ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून १२ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी लहान मोठ्या ४ ४जनावरांना जीवनरक्षक फाऊंडेशन हिंगणघाट येथे सुखरूप नेऊन दिले.