समुद्रपूर: वानरचुवा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतात बांधून असलेली गाय ठार: शेजारी बांधून असलेले चार बैल थोडक्यात बचावले
समुद्रपुर तालुक्यातील वानरचुवा गावातील शेतात बांधून असलेल्या गायावर वाघाने हल्ला चढवित गायीला जागीच ठार केले.यात शेतकऱ्याचे ४० ते ४५ हजार रुपये किमतीचे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार सोमवारी ३१ मार्चला रात्री वानरचुवा येथील उमेश शामरावजी वाघाडे यांच्या शेतात त्यांचे ४ बैल व १ गाय बांधून होती यावेळी रात्रीच्या सुमारास वाघाने गायीवर हल्ला चढवित जागीच ठार केले तर बाजूला बांधून असलेले ४ बैल सैरावैरा पळाल्याने थोडक्यात बचावले. यात शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.