नाशिक: म्हसरूळ गावातील स्मशानभूमी जवळ येथे अज्ञात कारचालकाच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू
Nashik, Nashik | Oct 14, 2025 म्हसरूळ गावातील स्मशानभूमी जवळ येथे अज्ञात कारचालकाच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबाई विश्वनाथ गवळी राहणार मोराडे गल्ली, म्हसरूळ गाव येथे स्मशानभूमी येथे बकऱ्या चालत असताना अज्ञात एका अनोळखी कारचालकांनी त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.