पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पशुधनावर अनेक प्रकारचे आजार दिसत असल्याने आज दिनांक 31 डिसेंबरला दुपारी बारा वाजता सुरळी येथील नागरिकांनी आपल्या समस्या मांडून, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गावागावात लसीकरण शिबिरे राबवून पशुधन तपासणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष किशोर भाऊ चेंबोले, व सरचिटणीस दिगंबर निकम यांनी प्रशासनाला दिला आहे.