परतूर: आष्टी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची 2पदे रिक्त, रुग्णांची होत आहे हेळसांड
Partur, Jalna | Apr 7, 2026 आज दिनांक 7 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त असल्याचे पाहायला मिळाले असून या रिक्त पदांमुळे परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन या ठिकाणी रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे तात्काळ भरावी जेणेकरून रुग्णांना योग्य रुग्ण सेवा मिळेल.