परतूर: आमदार निवासस्थानी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Partur, Jalna | May 1, 2026 आज दि.1 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर मंठा विधानसभा मतदार संघाचे माजी आ.तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्रीच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. मात्र ही घटना सकाळी घोडकीस आली,त्यांच्या या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये व मतदार संघांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून जेथिलिया यांचे नाव विकास पुरुष म्हणून मतदारसंघात प्रसिद्ध होते आणि त्यांच्या या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.