सेलू: कोतीवाडा वॉर्ड नंबर पाच येथे तरुणास मारहाण; आरोपीविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 12, 2024 काहीही कारण नसतांना एकाने मित्राकडे जात असलेल्या सागर लक्ष्मण माजरे वय 24 रा. देवतारे लेआऊट सेलू याला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना ता. 11 शुक्रवारी रात्री 8 वाजताचे सुमारास सेलू शहरातील कोतीवाडा येथे घडली. सागर माजरे याचे फिर्यादीवरून अक्षय खेमचंद रा. कोतीवाडा सेलू याचे विरुद्ध ता. शुक्रवारी रात्री 11 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती ता. 12 शनिवारला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.