सेलू: सिंदी-हेलोडी मार्गावर देशी दारूची वाहतूक करतांना एकास अटक, मुख्य आरोपी पसार; सिंदी पोलिसांची कारवाई
Seloo, Wardha | Oct 11, 2024 खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नाकेबंदी केली असता दुचाकीने अवैधरित्या दारूची दारूची वाहतूक करताना एका आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीकडून दुचाकीसह दारू, असा एकूण 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सिंदी पोलिसांनी ता. 10 गुरुवारी सायंकाळी 7 वाजताचे दरम्यान सिंदी-हेलोडी मार्गावर करण्यात आली. अशी माहिती ता. 11 शुक्रवारला सिंदी पोलिसांकडून प्राप्त झाली.