सेलू: झाकारपट्टी शिवारात गावठी दारू गाळप करणाऱ्यावर एलसीबीची कारवाई; मोहा दारुसह 1 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल नष्ट
Seloo, Wardha | Oct 19, 2024 गावठी मोहा दारू गाळप करीत असतांना एकास पोलिसांनी ताब्यात घेत मोहा दारुसह 1 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई ता. 17 गुरुवारी झाकारपट्टा शिवारात सायंकाळी 5 वाजता स्थानीय गुन्हे अन्वेषण पथकाने केली. याप्रकरणी आरोपी धनराज भाऊराव पचारे वय 27 रा. वॉर्ड क्र. 4 सेलू याचेवर रात्री 9 वाजता दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.