सेलू: मोपेड दुचाकी वाहनाने देशी दारूची वाहतूक करतांना सेलू पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक, 89 हजार 600 चा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Oct 18, 2024 देशी दारूची अवैध वाहतूक करीत असतांना दोन आरोपीस अटक करण्यात आली. त्याचे ताब्यातून वाहनासह 89 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वडगांव रोडवर आज दि.18 शुक्रवारी दुपारी 1 वाजता सेलू पोलिसांनी केली. नौशाद अली शौकत व इर्शाद लालूखा पठाण दोन्ही रा.वर्धा असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.