सेलू: सोनेगाव शिवारात शेतात पाणी ओलित करताना शेतमजुराचा मृत्यू, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Oct 17, 2024 शेतात पऱ्हाटीच्या पिकाला पाणी ओलित करीत असतांना शेतमजुराचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ता. 15 मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनेगाव शेत शिवारात उघडकीस आली. प्रकाश रामकृष्ण मोरे वय 47 वर्ष रा. मोई असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उमेश गुलाबराव चीचघरे वय 38 रा. शिवणगाव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रात्री 7.30 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.