नाशिक: अंबड भागातील चुंचाळे शिवार येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Nashik, Nashik | Oct 16, 2025 अंबड भागातील चुंचाळे शिवार येथे गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून १५ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजता अंबड पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 16 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर उत्तम पवार राहणार घरकुल योजना, चुंचाळे शिवार यांनी राहत्या घरात स्वतःला गळफास घेतला. औषध उपचारासाठी घरच्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलीस हवालदार चव्हाण याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.