शहादा: एक कोटी 81 लाख रुपयांची तांब्याची तार जावदे शिवारातून जप्त, ३ जणांविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल
ट्रक चोरीचा बनाव करून एक कोटी ८१ लाख रुपयांची तांब्याची तार लंपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी शिताफीने तपास करून जावदे येथून ट्रक मालकाचा भंडाफोड केला. याप्रकरणी ट्रक मालकासह चालकाला आणि ट्रक विकत घेणाऱ्या अशा तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.