शहादा: धडगाव रुग्णालयात १० महिन्याच्या बालिकेवर मुदतबाह सलाईन लावल्याने मृत्यू, दोषींवर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी
ग्रामीण रूग्णालय धडगाव येथे आरोही अजित पावरा वय १० महिने या बालिकेला मुदतबाह्य सलाईन लावल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित डाॅक्टर व परिचारिकास तात्काळ सेवेतून निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार, वैद्यकीय अधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.