नागपूर ग्रामीण: खुनाच्या प्रयत्नाचे रूपांतर खुनात; वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेतील आरोपीला अटक
वाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर-अमरावती रोडवरील एका दुकानात औषधी खरेदी करत असताना सचिन भुराणी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सन २०२३ मधील पूर्ववैमनस्य व संगनमत करून मारहाण केल्याच्या जुन्या वादातून हा हल्ला झाला. सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून जखमीवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली. पोलिसांनी आरोपी सागर चंद्रावत शोध घेऊन त्याला अटक केली