पालघर: बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचा वर्धापन दिन, मनोर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली.
बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचा आज दहावा वर्धापन दिन आहे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्त आज मनोर तालुक्यातल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव अभियान रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.