भोकरदन: भोकरदन रोडवर फाटा येथे अवकाळी पावसाचा लग्न सोहळ्याला फटका
आज दिनांक 31 मार्च 2026 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरासह परिसरात काल दिनांक 30 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जोरदार वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे या अवकाळी पावसाचा फटका लग्न सोहळ्याला बसला असून लग्न सोहळ्यासाठी टाकण्यात आलेला मंडळ पूर्णतः उडून गेला आहे, यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी जरी झाली नसली मात्र नुकसान झाले असून यात तात्काळ नवरी नवरदेव व नातेवाईकांनी योग्य ठिकाणी आसरा घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.