नागपूर शहर: गडचिरोलीत आश्रमशाळेत सर्पदंश: ३ विद्यार्थिनींचा मृत्यू; एका चिमुकलीवर नागपुरात तातडीने उपचार सुरू
गडचिरोली जिल्ह्यातील कुप्पा लिंगो अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत रात्री झोपलेल्या ६ विद्यार्थिनींना 'मण्यार' (क्रेट) या विषारी सापाने दंश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत ३ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. सर्पदंश झालेल्या एका ११ वर्षीय विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने विशेष हेलिकॉप्टरने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी दुपारी ४ वाजता तिला बालरोग विभागातील 'पीआयसीयू'मध्ये दाखल करण्यात आले.