जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे मा. खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.) , मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे (भा.प्र.से.) , तसेच समितीचे इतर सदस्य व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या "Operation TAPE For Safe" या विशेष रस्ता सुरक्षा उपक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, व्यापक जनजागृती अभियान, प्रभावी अंमलबजावणी, अभियांत्रिकी सुधारणा तसेच उपक्रमांतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या कामगिरीची सविस्तर माहिती उपस्थित मान्यवरांना दिली.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #RoadSafety #ratnagiri #RatnagiriPolice
37 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 17, 2026