हवेली: सासवड रस्त्यावर स्कूल बसच्या धडकेत 5 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर, शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल
Haveli, Pune | Dec 3, 2025 हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पायी निघालेल्या पाच वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्या मुलाची आई गंभीर जखमी झाल्या आहेत.मंगळवारी (ता. 02) साडेसात वाजण्याच्या सुमारास सावली होमच्या पुढे धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हि घटना घडली आहे. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.