नागपूर शहर: दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपीला अटक
7 जूनला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ५ जून रोजी रात्री इमामवाडा परिसरात रितेश वानखेडे या तरुणाला दारूसाठी पैसे न दिल्याने आरोपी मयंक यादव याने शिवीगाळ केली. त्यानंतर, आरोपीने रितेश व त्याचा मित्र शुभम यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेत रितेश गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मयंक यादव याला तात्काळ अटक केली आहे.