धुळे: महिलेच्या गळ्यातील मंगल पोत हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला नकाने रोड परिसरातून पोलिसांनी घेतले ताब्यात
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अनमोल नगर येथील महिलेची चोरट्याने मंगल पोत गळ्यातून हिसकावून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना रविवारी रोजी संध्याकाळी उघडकीस आलेली होती, या संदर्भात सदर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दिली असता, पश्चिम देवपूर पोलिसांनी आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त रित्या तपास केला असता नकाने रोड परिसरातून या चिरोट्याला मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.